माय मराठी
माय मराठी
माझी मराठी माऊली
जणू मायेची ती मुर्ती
तिच्या ह्रदयात प्रेम दाटे
होई झाडाची सावली
तिच्या शब्दामध्ये धार
सज्ज घेेेेऊन तलवार
करी अन्यायावर वार
कधी आधाराची ढाल
शाहाण्या शब्दाचा हो मार
शब्द होई हो अंगार
होती शब्दाचे हो मोती
पसरे मराठीची कीर्ती
