STORYMIRROR

उत्तम गांवकर

Others

3  

उत्तम गांवकर

Others

रंगमंच

रंगमंच

1 min
207

आयुष्य म्हणजे रंगमंच आहे

तूं येथला कलाकार आहे.

वेदना तूं आपल्या झाकून साऱ्या

रंग फासूनी हसायचे आहे

मनं मोडूनि येथे

आपुले स्वतःचे 

आनंदी दुसऱ्यास

करावयाचे आहे

दुःख ना जाणवावे

कुणाला म्हणुनी

तुला येथे सार्यांना

जपायचे आहे

शब्द ना लागो 

कुणाच्या मनाला

तुला गोडं वाणीत

बोलायचे आहे

अभिनय कर तूं

जीवनाचा आपुल्या

आयुष्य एक

रंगमंच आहे



साहित्याला गुण द्या
लॉग इन