STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

युगे युगे

युगे युगे

1 min
134

करकच्च बंधन बांधलेस युगे युगे

वणव्यात यौवन जाळलेस युगे युगे


घरदार सुंदर बांधलेस जरी तुझे

सुमनास कोमल तोडलेस युगे युगे


मन आरसा सगळे खरे तुज सांगतो

नयनात काजळ घातलेस युगे युगे


जगण्यास भाकर मीठही मिळते कुठे

गगनात जीवन शोधलेस युगे युगे


धनवान ओळख सांगतोस तुझी मला

गरिबास केवळ टाळलेस युगे युगे

 

कळ काळजात सतावते मज सारखी

तळव्यास औषध लावलेस युगे युगे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy