STORYMIRROR

Manisha Patwardhan

Tragedy

3  

Manisha Patwardhan

Tragedy

दुखरी नस

दुखरी नस

1 min
190

फोन जोरात खणखणला 

आणि तीचा देह 

धडपडत उठला 

आनंदाने उर तीचे 

कस धडधडल 

मनाच पाखरू 

मनीच फडफडल 


ती धरूनच चालली मनात 

त्याचाच फोन असणार  

तो येणार ....... 

दिवाळीला नक्कीच येणार  


फोन क्षणीच  

कट झाला 

पण विचार मनी

पक्का झाला  

त्याच्या वाटे वरचा 

वारा हळूच हलला 


दुखणी , खुपणी 

बाजुला सारली 

ताडकन उठून 

कामाला लागली 

चकली , चिवडा , शेव 

लाडू , करंजी , शंकरपाळे 

पदार्थांनी बरणी भरली 


शेवटी दिवाळीचा 

दिवस उगवला 

आता येईल 

मग येईल 

सारा दिवस  

वाट पहाण्यात गेला 

देह तीचा क्षीण झाला 


सारे दिवस दिवाळीचे 

असेच सरले 

वाट पाहून डोळे शिणले 

पण तो....... 

आलाच नाही  

फोनही परत  

वाजलाच नाही  


एक दिवस  

असा उगवला 

दाराचा आवाज आला  

नेहमी प्रमाणेच  

दारी पोस्टमन आला 

तीने सही करून  

चेक घेतला 

कपाटात ठेवून दिला 

मेल्या मनानी 

क्षणभर चेक कडे पाहिल 

मग झटकन कपाट लावल 


दडपलेली भावना  

डोक काढून वर आली 

शरीराचा कोपरा कोपरा 

दुखत असल्याची 

जाणीव झाली  


तशीच ती 

धडपडत उठली 

आणि............ 

बामचा वास येणाऱ्या 

कधीच न धुतलेल्या  

हांतरूणा वर येऊन पडली 

निष्प्राण झालेल्या डोळ्यांनी 

आढ्याकडे एकटक 

पाहू लागली.......... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy