बापाच मरण
बापाच मरण
क्षण शेवटचे मोजताना
बाप दाराच्या उंबऱ्यावर बसुन
पोराची वाट पहात होता
कोणीतरी निरोप पाठवा म्हणून याला त्याला
सांगत होता
पण दुरदेशी गेलेल्या पोराला
बापासाठी यायला वेळ कुठे होता
लेकराचं बालपण बापाच्या डोळ्यासमोर फिरत होतं
जणू सार काही आत्ताच घडत होतं
काळजीत बाप सार काही आठवत होता
त्याला कडेवर घेतलेला फोटो रडुन रडुन पहात होता
अचानक बायकोचा आधार तुटला
बापाचा धिर सुटला
बापाच ओझ नको म्हणून
पोरगा घर सोडून गेला
लेकरावाचुन बाप पोरका झाला
म्हातारपणाचा हात हातातून निसटला होता
त्या रिकाम्या घरात बाप स्वतःलाच मिठी मारून बसला होता
बाप स्वतःसाठी कधी जगला नाही
जिवाची पर्वा कधी केली नाही
स्वप्न घेऊन तो सरत राहीला
पोरासाठीच मरत राहीला
आजारपणात पोरगा जवळ असण्याची ईच्छा होती
शेवटच्या भेटीसाठी बापाची पोराला हाक होती
बाप जिव धरून बसला होता
पण पोरगा बापाला विसरला होता
पोरगा बापासाठी कधी जगला नाही
निरोप पाठवूनही आला नाही
कितीही झाल तरी बापाचा जिव
पोरात अडकला होता
पोराच्या आठवणीत प्राण
सोडत होता
शेवटी मुलाच्या नावावर केलेली प्रॉपर्टीचं भिंडोळ
ठेवून
बाप बिचारा समशानात
एकटाच जळतं होता
