हृदयसंगिनी
हृदयसंगिनी
थाटण्या तिचे गुणगीत
हा शब्दपसारा मी मांडला
काय वर्णावी तिची अदा
शब्दामृत खुद्द तयात सांडला
आक्रंदली कैक स्पंदने उरी
हृदयाची काजळी सारवून
स्मित तिचे हे असे बोलके
जिंकले माझ्यातला मी हरवून
कळते स्नेहाची परिभाषा
अंतरंगी तिला पाहून
नयनी दाटलेल्या नभांतली
आसवे गेली मज न्हाऊन
किती लपवू हट्टी भावनांना या
ऐक त्यांचाही आर्तस्वर कधी
होशील का हृदयसंगिनी माझी
अजून किती घेशील अवधी
