STORYMIRROR

swapnil dhane

Tragedy

4  

swapnil dhane

Tragedy

स्मरणकडा

स्मरणकडा

1 min
113

जीर्ण झालेल्या हातांनी

कंपत फडताळ उघडलं

तसं पायथ्याशी एक 

गाठोडं खाली पडलं


त्यात दडल्या होत्या

गतकाळाच्या असंख्य आठवणी

कदाचित नियतीने स्वखुशीने

केली असावी पाठवणी


एक-एक आठवणी चाळताना

हात अधिकच थरथरत होते

विरून गेलेल्या आयुष्याचे

आता उसवले होते पोते

 

स्मरणकडा हळुहळू आता

लागल्या होत्या पानवू

मिऱ्या पडलेल्या चेहऱ्याला 

लागल्या होत्या वदवू


काही काळ ‌का होईना

दूर झाले ते एकाकीपण

तिच्या आठवणीने फुलले

जीर्ण त्वचेखाली तरुणपण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy