STORYMIRROR

Sushama Gangulwar

Tragedy

4  

Sushama Gangulwar

Tragedy

अशी का अचानक

अशी का अचानक

1 min
454

अशा या सांजवेळी सखी 

बसलो मी नदी किनारी 

तुझ्या आठवणीतली 

प्रत्येक क्षण बाळगून उरी......


कित्येक वेळा तुला भेटण्या

आलो मी तुझ्या दारी 

उत्तर मात्र एकच मिळाले 

तू नाही आहेस तुझ्या घरी........


सांग ना सखे तू अशी 

अचानक सोडून गेली कुठे 

वाट तुझी पाहून आता 

माझ्या संयमाचा बांध सुटे.......


तुझ्या दुराव्याने सखी 

डोळ्यात अश्रूंचा पूर दाटतो 

दे एकदा काळजातून हाक 

मी तिथे येऊन तुला भेटतो.......


असा अबोला का माझ्याशी 

काय झाला माझा गुन्हा 

सांग तू तुझ्या मुखातून मला 

मी तुला शोधणार नाही पुन्हा......


माझ्यावर खरं प्रेम असेल 

तर तू नक्की परत येशील 

आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत 

माझी साथ तू नक्की देशील......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy