वासनाध नजरा
वासनाध नजरा
कमनीय बांधा
काया चमकदार
पाठीवर रूळतोय
चोळीचा दोर झाकदार.....
रूप तुझ पाहून
होईल घायाळ गडी
झाकून घेग तनू
चोळीची सोडील नाडी....
पाहता नार सुकोमल
लाळ टपकते तोंडातून
अशी हैवान जात वासनांधाची
तोडतील लचके नजरेतून....
झाकुन घे काया तुझी
नजर न लागो कुणाची
अंगभर वस्त्र घाल पोरी
काळजी ग स्वतःची......
उघड्या तनुने फिरु नको
वासनांधांना खुणवू नको
तनू लपव तुझे कोमल वस्त्रात
कोणाच्या बळी तू पडू नको
