STORYMIRROR

Rekha Kulkarni

Tragedy Inspirational

4  

Rekha Kulkarni

Tragedy Inspirational

शहीद सैनिकाच्या मुलाची भावना

शहीद सैनिकाच्या मुलाची भावना

1 min
577

घरी आली शवपेटी ,

तिरंग्यात लपेटून .

दारी गर्दि दाटलेली ,

वाटे आला मोठा सण .....१


तुम्हा लपेटे तिरंगा ,

लपेटावे मी कोणाला ?

कुणा मिठी मारू आता ?

पारखा मी त्या क्षणाला .....२


जाता देश रक्षणार्थ ,

वाटे मला अभिमान .

बाप माझा देशासाठी 

प्राण देण्यास तयार .....३


तुझ्या विक्रमी बाहूंनी ,

स्वातंत्रता हि राखली .

माय होऊनी राहिली

आम्हा साऱ्यांची सावली .....४


वीर मृत्यू रणांगणी ,

जाऊ देणारा ना वाया .

घेतो शपथ मानात,

देशासाठी माझी काया ......५



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy