अनुबंध
अनुबंध
हे बंधन 'बंध' मांनले नाही,
अनुबंध जोडले तेव्हा...
नात्याची गुंफण केली,
प्रेमाचे शिंपण त्याला...
धुसफुस अन् भांडण रुसवा,
'बोलका’ दीर्घ 'अबोला...’
सहवासी रमता रमता,
संसारी गोडी त्याला...
आता तर सारे कळले,
ते लटके फसवे होते...
प्रेमाची पारख करण्या,
ते जरा जरूरी होते...
हे अद्वैताचे नाते,
जन्मांतरी निभवू आपण...
या नात्याचा सरताज,
मानाने मिरवू आपण...

