धुंदी प्रेमाची
धुंदी प्रेमाची
नजरानजर तुझी माझी ,
चढली तुझ्या प्रेमाची धुंदी .
सुचे ना मज काही आता ,
कशी केलीस नजर बंदी .
नजर बंद झाले मी ,
पिंजरा तुझ्या नेत्राचा .
कैद जन्मभराची ही ,
की आधार तुझ्या बाहुचा.
प्रेमात धुंद होते मी,
उतरते धुंदी तनमनात .
अंतरीचे गुज तुझे ,
समजे मज अंतरात .

