जरा अधीर
जरा अधीर
का सांग आज माझा गेला असेल तोल
म्हणूनच तू अशी का झालीस गं अबोल?/धृ/
माऊ मुक्त कुंतलाच्या,
स्पर्शे सुखावलो मी.
म्हणूनच स्कंदी तुझिया,
थोडा विसावलो मी.
अपराध हाच माझा झालो जरा अधीर /१/
अधरावरिल हासू ,
पाहून भारलो मी.
त्या स्पर्शीण्या जरासा ,
थोडा धिटावलो मी .
अपराध हाच माझा झालो जरा अधीर /२/
पाहून सिंहकटिला ,
आधीर हात झाले .
घेण्या कवेत तिजला ,
सहजी पुढे निघाले.
अपराध हाच माझा झालो जरा अधीर/३/
गाली गुलाब फुलला ,
रंगून त्यात गेलो .
अन् हुंगण्या तयाला ,
थोडा अधिक झुकलो .
अपराध हाच माझा झालो जरा अधीर/४/
सारे तुझे तरीही ,
माझेच भासताहे .
माझे मला मिळावे ,
हा ध्यास मात्र आहे .
अपराध हाच माझा झालो जरा अधीर/५/
म्हणूनच तू असे का झालीस ग अबोल
का सांग आज माझा गेला असेल तोल/धृ/

