ओढ अंतरीची
ओढ अंतरीची
1 min
249
सान पाऊली येती आठवणी
ओढ अंतरी तुझी लागते .
सुंदर पक्षी गाती गाणी ,
वाणी माझी तुला आळविते .
सांज सकाळी तुला शोधते ,
नजर बावरी वेडी होते .
आकाशीची लाली पाहून ,
मनात मीही लज्जीत होते .
सुगंध उधळीत अवखळ वारा ,
आलिंगन सर्वा देतो .
आठवणीने क्षणाक्षणाला ,
कणकण हा पुलकित होतो .
