STORYMIRROR

Rekha Kulkarni

Others

3  

Rekha Kulkarni

Others

रंगुनी प्रेमात

रंगुनी प्रेमात

1 min
189

रंगुनी प्रेमात प्रियाच्या ,

रंग बिलोरी आयुष्याचे .

प्रेमाच्या या हिंदोळ्यावर ,

पुरे होई स्वप्न मनीचे .


रंगुनी प्रेमात प्रियाच्या ,

रंगत न्यारीच आली ग ,

माझी मी ना उरले आता

धुंदीत प्रीत नहाली ग .


रंगुनी प्रेमात प्रियाच्या , 

अर्थ गवसला प्रीतीला .

तुझ्या नी माझ्या संसाराच्या , 

नजर न लागो सौख्याला . 


Rate this content
Log in