सख्या
सख्या
सहवाशी रमते तुझ्या ,
तुझ्या स्वप्नातच रहाते .
आठवणीत तुझ्या सख्या ,
सख्या मी मोहरून जाते .
आठवते तुझ्या मिठीत ,
मिठीत अश्वासने किती .
तुझ्या नयनाच्या सागरी ,
सागरी प्रणय रंगती .
तुझ्याच बाहूंचा आधार ,
आधार तुझा जीवनात .
मी आहे सावली तुझी ,
तुझी प्रतिमूर्ती मनात .
सोबतीला तु असताना ,
असताना कुठले भय ?
आयुष्याच्या वाटेवरती ,
वाटेवरती तुझी सय .

