गालीचि खळी
गालीचि खळी
सखे लावण्यखणी तू ,
अति सुंदर सुंदर .
रूप पौर्णिमेचा चंद्र ,
खळी तुझ्या गालावर .
खळी तुझ्या गालावर .
प्रभा हश्याची फाकते .
जादुगरी माझ्यावर ,
मन पाकळी फुलते .
मन पाकळी फुलते
तुझ्या गाली खळी जशी .
जीव उतावीळ होई ,
वाढे बेचैनी जराशी .
वाढे बेचैनी जराशी ,
ओढ मना ग लागते .
माझी ओढाळ नजर ,
हळू खळीत डुंबते .
हळू खळीत डुंबते ,
कुठे समाधानी होई?
आसं अमृत पानाची
चुंबनाने पूर्ण होई .
चुंबनाने पूर्ण होई ,
किंवा अजून वाढते .
माझ्या जीवाचा ही जीव ,
खळी मला गं छळते .
खळी मला ग छळते
परी सुखावे नजर ,
अहोरात्र मनामध्ये ,
तुझ्या प्रेमाचा गजर .
तुझ्या प्रेमाचा गजर ,
माझ्या कानामधे गुंजे.
सखे लवकर ये ना ,
तुझे पैंजण ही वाजे .
तुझे पैंजण ही वाजे ,
मुखचंद्र उजळले .
गालावरच्या खळीत ,
छान कमळ फुलले .

