Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Marathi Kavi Gajanan Uphade

Tragedy

3  

Marathi Kavi Gajanan Uphade

Tragedy

हल्लीचं प्रेम

हल्लीचं प्रेम

1 min
173


अगं मला दुसऱ्यांदा प्रेम झालंय हे ऐकूण तिची मैत्रीण गप्पच झाली

तिने तेल मीठ लावून जेव्हा सांगायला सुरुवात केली

असं वाटतं प्रेम म्हणजे काय आम्हाला कळलच नाही अजूनही

प्रेमाचं आणि आमचं जुळलच नाही अजूनही

मी बघतोय प्रेमाला कुठल्या तरी कोपऱ्यात दम तोडताना

आणि बर्बाद होऊन टाहो फोडताना

नॉर्मल झालाय स्पर्श आणि शरीराचा खेळ

करुन टाकलीये सगळ्या भावनांची भेळ

प्रेम सकाळी चालू होतं दुपारी संपतं

आणि संध्याकाळी मन लगेच दुसरीकडे जुंपतं

हेच काय ते प्रेमाचं आयुष्य ठरलंय

आम्ही प्रेम लचके तोडून मारलंय

अरे प्रेम म्हणजे नाही एक्सचेंज हृदय

प्रेम म्हणजे दुराव्याचं भय

प्रेम म्हणजे अंतकरणातला जिव्हाळा

प्रेम म्हणजे अंतरी जाणवणाऱ्या झळा

प्रेम म्हणजे अबोल शब्द

प्रेम म्हणजे स्पर्श निःशब्द

कुणी लुटला हा प्रेमाचा सुंदर गाव

कुणी रक्ताळला तो भावनेचा घाव

हल्ली नात्यात केवळ वरवरचं जीव लावणं भासतं

गजानना कुणी सांगेल का रे प्रेम म्हणजे नेमकं काय असतं...


Rate this content
Log in

More marathi poem from Marathi Kavi Gajanan Uphade