STORYMIRROR

Shakil Jafari

Tragedy

4  

Shakil Jafari

Tragedy

फेकू नका अन्न, बरा नाही माज

फेकू नका अन्न, बरा नाही माज

1 min
518

फेकू नका अन्न

बरा नाही माज

बाळगा हो लाज

आतातरी !


देवाचे आभार

दिले हो जीवन

केले हो पोषण

माणसांचे !


कळत का नाही

प्रसाद देवाचा

अस्तित्व देहाचा

अन्नामुळे !


करतात पाप

अत्याचार मोठे

बोलतात खोटे

पोटासाठी !


घामाच्या रूपात

रक्त ही वाहिले

कष्ट ही साहिले

शेतकरी !


सुखात राहावे

सदा सर्वकाळ

तुझे मुलंबाळं

अन्नदाता !


रोज जेवतांना

उपकार मानावे

आभार म्हणावे

बळीराजाला !


अल्लादेवा म्हणत

अन्नाचा घ्या स्वाद

'शकील' प्रसाद

भक्तिभावे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy