STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Tragedy

4  

Sanjay Dhangawhal

Tragedy

त्याची आई

त्याची आई

1 min
222

ती त्याचा बोट धरून

त्याला चालायला शिकवायची

त्याचा लडिवाळा पाहून हसायची

कालांतराने त्याने तिच्या हातून बोट काढून घेतला

तिचे मातृत्व विसरून सोडून गेला


ती त्याची आंघोळ पांघोळ करायची 

झोळीत टाकून झोपवायची

तिच्या अंगाईच्या गोडव्यानेच तो मोठ होत राहिला

कालांतराने तो तिच्यापासून दुर जात राहिला..


ती त्याची शी सु आवरायची

कुशीत घेऊन त्याचे लाड करायची

त्याला मोठ करताना 

तिने कधी कंटाळा नाही केला

कालांतराने तो तिला अंतर देत राहीला


कुणाची नजर लागु नये म्हणून

ती त्याला काळा टिका लावायची

स्वतःपेक्षा त्याची जास्त काळजी घ्यायची

कालांतराने तो मोठा साहेब झाला

ती बोलवत असुनही

तो तिला भेटायच टाळत गेला


तिच्या म्हातारपणात तो 

तिच्या जवळ नव्हता

तिने त्याला जन्म दिला काय तो गुन्हा होता

असा कसा तो पाषाण झाला

जणू तिच्या ममतेचा घात केला

आता ती त्या नऊ महीन्याचा काळ आठवत होती

वृद्धाश्रमाच्या उंबऱ्यावर बसुन

तो येण्याची वाट पहात होती

का त्याला आपल्या आईची आठवण येत नव्हती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy