STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Tragedy

4  

SHUBHAM KESARKAR

Tragedy

निर्भया....!!

निर्भया....!!

1 min
130

देव देतो तोच नेमतो

कोणी कसे रहावे

स्त्री-पुरुष भेद मानवात

आपणच नष्ट करावे !! धृ !!


आठवत का तुम्हाला……..!!


हाच तो महिना नि

हाच तो काळ

सुरक्षित ह्या भारतात

घडले अक्षम्य व्यवहार !! १ !!


उन्मत्त नशेत माजून

ते सैतान झाले होते

निकृष्ट ओंगळ भावनेला

पुरुषार्थ समजत होते !! २ !!


अघटित , अगणित , अपरिचित

वाटत होते हे सर्वस्व

वेदनेच्या ह्या दुःखात

हळहळला हा देश स्वातंत्र्य!! ३ !!


भीतीच आता उरली नाही

म्हणूनच हे सर्व सुचत आहे

पेकाट्यावर फटके पडल्याखेरीज

हे जग काही सुधरत नाही!! ४ !!

हे जग काही सुधरत नाही!! ४ !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy