वाहू दे रे प्रीत...
वाहू दे रे प्रीत...
थांबली रे किणकिण पैंजणाची आज
बागडण्याचा सुटला नाद घुंगरांचा
भेटण्या आतुरले श्वास श्वासास मितवा
हृदयात झाला गुंता तुझ्या आठवांचा
पावसाळा नव्हे हा तांडव चाले आभाळाचा
गर्द छाया प्रेमाची कधी कडकडाट भावनांचा
का थांबलास गोठल्यागत रे नभा
बेभान हवा तूही घे पुरवून हट्ट मिलनाचा
थेंबाच्या स्पर्शासाठी तरसली रे धरा
सोसवेना आवेग का उसळणाऱ्या लाटांचा
नको विध्वंस फुलू दे मळा येथे प्रेमांकुरांचा
वाहू दे रे प्रीत नको हा विरह युगायुगांचा
