नभा तू समजून घे ना
नभा तू समजून घे ना
धरणी गुपीत सांगेल कशी
नभा तू समजून घे ना
ओढ लागली मिलनाची
एकदा तू बरसून घे ना
लागली आस जन्मांतरीची
घेशिल ओल्या मिठीत तू
खोटा तरी भास प्रणयाचा
एकदा तू जागवून ये ना
स्वप्न रंगवण्यात ती
गुंतून गेली अशी की
हरवला सूर काळजाचा
एकदा तू तार छेडून दे ना
तळमळती श्वास तीचे
अन् गहिवरले अंतर्मन
हरवले देहभान सारे
एकदा तू सावरुन ये ना
वीज चमकतेय काळजात
प्रकाश दिसे साऱ्या जगा
पण वेदना होई किती तीला
एकदा तू विचारून घे ना

