किती बळी घेशील रे अजुन प्रेमा
किती बळी घेशील रे अजुन प्रेमा
तुझ्यात जीव माझा गुंतला
असं तु पुन्हापुन्हा म्हणला
नाही शरीराची भूक मला पण मैत्री असू दे
श्वापदांपरी लाग नको भावनांचे सुख दे
तु बोललेला शब्दन्शब्द मला प्रिय आहे...
तुझ्या या शब्दांनी मन बहरले
माझेही भान हरपले...
बोलणे वाढले अन् भेटीसाठी मन वेडावले
एक न् दोन अनेकदा भेटलो आपण...
सहवासात अख्ख विश्व विसरलो आपण..
मानसांचा समाज तो कसा स्विकारेल या नात्याला कळत होते रे तुलामला
पण प्रीत मनात रुतली होती...
हळूहळू भावना बोथट झाल्या भूका भागत गेल्या
मी माझं अस्तित्वच बदललं रे तुझ्यासाठी मी झालो स्त्री...
पण आता माझी हार झाली
तुझ्या जवळीकतेपेक्षा फास मला प्रिय वाटला
व्याकुळ या देहाचा मी क्रुरतेने गळा घोटला
अरे...रडतोस कशाला...
वेदनेने जर्जर हा फक्त देह जळतोय माझा
आयुष्य तर कधीच संपलेय माझे
आयुष्य तरी काय होते...फक्त तुझे प्रेम ..!
थाट संसार पुन्हा नव्याने...
बायका मुलांना जप तुझ्या...
किती बळी घेशील रे अजुन प्रेमा...
कधी तरुण, कधी तरुणी, कधी युगुलांनी संपवली जीवनयात्रा
अन् आता समलिंगी तरुणाचा हा करुण आर्जव...
