फाटले आभाळ आज...
फाटले आभाळ आज...
1 min
587
सोसवेना आनंद नभीचा
ओघळले हे अश्रू अलगत गालावरती
मातला कल्लोळ भावनांचा
सोसवेना यातना या साजना दे मज मुक्ती...
अनोळखी वाटे जग हे
झाले मि पोरकी अन् हे जग मज परके
किती फोडू टाहो अन् सांगू कुणा या यातना
अंतरात्मा झाला मुका अन् ओठांना पडले टाके
फाटले आभाळ आज
पण पाण्याविण नुस्त्या ज्वाळा
भिजले कपडे चिंब झाले अन् भावना ओल्या
फटफटल्या गाभाऱ्यात आठवांच्या तप्त झळा
