कितीदा सख्या रे तुला आठवावे...
कितीदा सख्या रे तुला आठवावे...
झाकोळले रे आसमंत सारे
अन् शहारली ही ओली माती...
बघ तुझ्या अशा या बरसण्याने
आज उगवली ही प्रेमांकुर किती...
हरवले रे क्षण ही माझे धुक्याने
आठवांनी आज बावरी झाली प्रीती...
हळवी झाली मनाची ओली किनार दुराव्याने
प्रतिबिंब माझ्या डोळ्यातले तुज दाखवू कशी...
तुझ्या मिलनाने मी चिंब भिजावे
कितीदा सख्या रे तुला आठवावे....

