प्रिय गजू...
प्रिय गजू...
1 min
441
आभाळातून जसा दिसावा
इंद्रधनू भूवरी
रंगबिरंगी क्षणाक्षणांनी झाली
उधळण आनंदाची
नवे धुमारे फुटे तरूला
पल्लव पानोपानी
तसा लाभला तुझा सख्या रे
सहवास या जीवनी
ऊन,वारा,पाऊसधारा
झेलीत या अंगणी
सख्या राजसा तुझ्या सवे मी
समृद्ध या भुवनी
तु जेवावे पंचपक्वान
मि असावे पंगतिला
लाभो सर्व सुखे तुला
मि असावे संगतीला
