सर आज कळले मला
सर आज कळले मला
तेव्हा नव्हते माहीत
हे वरवरचे वागणे
होते भल्यासाठी आमच्या
वाटायचे हा तर
चेहरा वाईट आहे तुमचा
परंतु आज जेव्हा
आहे जागी तुमच्या
तेव्हा कळते मला
सर खूप चुकलो तुम्हाला समजायला १.
जेव्हा रडत मी बसायचो
मला वाटायचे सारखे
तुम्ही येवूनी जवळ
विचारपूस करावी माझी
परंतु समजतय आत्ता मला
तुमच्या न येण्याच कारण
मी देतो धन्यवाद तुम्हा
ज्यामुळे संकटाना झुंजण्याचे
सामर्थ्य मिळाले आम्हा
खरच सर आत्ता कळते आहे मला
आणि तुमचे आभार मानायला वेळ लागला मला २.
माझे असायचे आवडते सर तुम्ही
पण तरीही अभ्यास मात्र करत नसे मी
त्यावेळी होऊ नये नापास मी
म्हणून तुम्हीच केली नेहमी मदत मला
आणि सर म्हणजे नेमके काय असते हे आत्ता कळले मला ३.
आर्शिवादाने तुमच्या आज पोचलो इथवर मी
तरीही येवढे पुढे येवूनही
तुमची आठवण सदा येत राहील मला
कारण कौतुकासाठी तुमच्या पडतील शब्द अपुरे
तुम्हीच माझे सर्वात मोठे मार्गदर्शक आहात हे लक्षात राहील मला. ४.
