STORYMIRROR

Ramkrushn Patil

Romance Tragedy

4  

Ramkrushn Patil

Romance Tragedy

आठवण

आठवण

1 min
353

आज घरातुन निघालो

कामावर जाण्यासाठी

पावसाने हेरलं मला

बरोबर त्या जागी

जिथं माझी आणि तिची

भेट झाली होती पावसामधी


आजचा पाऊस खरा

तिची आठवण करून गेला

तिच्या आठवणीत मला

ओलाचिंब करून गेला


पावसाची खरी किमया

आज दाखवून गेला

रडलो आज तिच्या आठवणीत

पावसाने मात्र माझे अश्रू

नाही दिसू दिले कुणाला


पाऊस मला भिजत होता

पण मन मात्र माझं

कोरडचं होत तिच्याविना

हे पावसाला मात्र

कुठे समजत होत



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance