वाट
वाट
तुझी तासनतास वाट बघायचो
सकाळच्या बसला तुझी झलक बघण्यासाठी तरसायचो
तुझ्या एक झलकेने डोळ्याचे पारणे फिटायचे
संध्याकाळी बसच्या गर्दीत तुलाच शोधायचो..!!
तुला बघतां येईल असा कोपरा पकडून उभा रहायचो
स्टाॅप येताच तुझा मनांत कसंतरी वाटायचो
रात्रीला फक्त तुझीच स्वप्न बघायचो
या कुशीवरुन त्या कुशीवर सकाळची वाट बघायचो..!
पुन्हा सकाळी तासनतास तुझी वाट बघायचो
तुझ्या येण्याची चाहूल लागताच हदयात धडधड व्हायचे
तुझ्या अलगद उडणार्या बटा बघून मन झोका खेळायचे
तुझ्या गोड हसण्यात माझं हदय गुंतायचे...!!!!
एक दिवस नाही दिसल्यास काळजात धस्स व्हायचे
संपु्र्ण दिवस मन कुठेच नाही रमायचे
पुन्हा सकाळी तासनतास तुझी वाट बघायचो
तु दिसताच जीवात जीव येवून बरे वाटायचे....!!!!
रविवारची सुट्टी उगाचच आहे असं वाटायचे
गावातल्या देवीजवळ तुलाच मागायचो
जत्रेत तुझ्याच दर्शनासाठी यायचो
साडीमध्ये तुला बघून वेगळ्या स्वप्नात रंगायचो....!!!
बघतां बघतां काॅलेजचे वर्ष संपले
प्रपोज करायचे राहूनच गेले
लग्न पत्रिका हातात पडताच डोळे पाणावले
लग्न करुन तुझा संसार सुखात चालू आहे
शेवटी,
माहेरी येण्याची तुझी खबर मिळताच स्टेशनवर तुझी आजही तासनतास वाट बघतोय....!!!!
