प्रेमाची किंमत
प्रेमाची किंमत
काय माझ्या प्रेमाची
वाटते तूला किंमत आहे
आता ठरवायला कुणात
आज इथे हिंमत आहे || 0 ||
सारं काही कवडीमोल
सगळीकडे झोलंच झोल
इतकं खरं प्रेम करून
सर्व ठरलं आहे फोल
रडतोय इथे खरा प्रेमी
हिच मोठी गंमत आहे
आता ठरवायला कुणात
आज इथे हिंमत आहे || 1 ||

