Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Romance Tragedy Others

4.0  

Rakesh More

Romance Tragedy Others

नको मागू माझ्याकडे

नको मागू माझ्याकडे

1 min
184

नको मागू माझ्याकडे 

तीच प्रीत पुन्हा 

नको गाऊ माझ्यासमोर 

तेच गीत पुन्हा || 1 ||

सहन होत नाहीत त्या 

गोड आठवणी 

पाठलाग करतात यांच्या 

दुःखाच्या साठवणी 

नको आता जगण्याची 

तीच रीत पुन्हा || 1 ||

हरलो एकदा तुझ्यापुढे 

आता धोका नको 

तोच खेळ हृदयाचा 

नवा मोका नको 

नको आता डाव आणि 

हार जीत पुन्हा || 2 ||

तेच सुर तेच ताल 

तेच राग तेच साज 

प्रेमात झुरत जगण्याचा 

तोच जुना जीर्ण बाज 

नको हृदय छेडणारं 

तेच संगीत पुन्हा || 3 ||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance