दिवाळी स्पर्धा
दिवाळी स्पर्धा


उंबरठ्या बाहेर केली दिव्यांची आरास
किती आनंद झाला पहा साऱ्या घरास!
प्रकाशू दे तेजाने गरीबांची झोळी
हीच माझ्या स्वप्नातील दिवाळी
दारासमोर लगडला नक्षीदार कंदील
वावरू लागले घरात सारे जिंदा दिल
जळू दे प्रभेने दारिद्रयाची रात्र काळी
हीच माझ्या स्वप्नातील दिवाळी
लाडू,करंजी अशा पंच फराळाचा थाट
सुशोभित करती घरातील चांदीचे ताट
मिळू दे गरीबाला रूचकर शंकरपाळी
हीच माझ्या स्वप्नातील दिवाळी
रूबाबदार कपड्यांनी सजले पहा अंग
प्रदूषणमुक्त फटाक्यांत घर सारे दंग
लाभू दे नववस्त्रांची गरीबांना झळाळी
हीच माझ्या स्वप्नातील दिवाळी
सहानुभूती नको त्यांना करतील ते कष्ट
काम मिळताच त्यांची गरीबी होईल नष्ट
सगळ्यांना मिळेल श्रीमंतीची पुरणपोळी
वास्तवात येईल माझ्या स्वप्नातील दिवाळी