STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Others

3  

Raakesh More

Romance Tragedy Others

अशी का वागतेस तू

अशी का वागतेस तू

1 min
199

अशी का वेड्यासारखी 

वागतेस तू 

हे काय भलतंच 

मागतेस तू || 0 ||


तू म्हणतेस 

पुन्हा कधी भेटणार नाही 

नातं विझलं  

पुन्हा कधी पेटणार नाही 

जगाच्या नादी का 

लागतेस तू || 1 ||


का तूला तोडायचंय 

प्रेमाचं नातं 

काय झालंय सांग तुझं 

मन का खातं 

अशी का हृदय माझं 

फाडतेस तू || 2 ||


काय झालं मला तू 

सांगशील का 

कधी तरी विश्वास ठेवून 

वागशील का 

अशा का भावना माझ्या 

गाढतेस तू || 3 ||


तुझं वचन आणा भाका 

विसरलीस सारं 

मन तुझं बदललं 

बदललं वारं 

असं का तोंडावर 

पाडतेस तू || 4 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance