STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Tragedy

कुणी नाही

कुणी नाही

1 min
142

वादळात सहकारी थांबला कुणी नाही

भाव आसवांमधला जाणला कुणी नाही


 कोसळून वेगाने धबधबा पुढे गेला

 खोल घाव पाण्याचा मिटवला कुणी नाही


 पाट वाहिले रक्तांचे जगात युद्धाने

 पूल एक प्रेमाचा बांधला कुणी नाही


 खेळतो तुफानांशी सागरात नावाडी 

भीत भीत जगणारा वाचला कुणी नाही


 बेगडी जगामध्ये शोधतोस प्रेमाला

 आतल्या असामीला भेटला कुणी नाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy