सण
सण


सण आहे सर्वांसाठी
दुरूपयोग नको नाशासाठी
सण एक नवा उत्साह
नको भांडण कलह
नको गालबोट आनंदाला
गोडवा जपा प्रत्येक सणाला
शिस्त तुम्हीच तुम्हाला
लावा आदर्श जपण्याला
नको शाप आपणाला
मुक्या प्राण्याचे ऐकण्याला
जीव सृष्टीचे रे सकळ
मन आहे त्यांचे निर्मळ
राखा निसर्गाचा ठेवा
कायदा निसर्गाचा पाळावा
ज्यांनी रक्षिले आपणाला
सुखी संपन्न होण्याला
सण असा ही असावा
गरीबांस आनंद मिळावा
नको प्रतिष्ठा पणाला
साधासुधा साजरा करण्याला