समाधी सोहळा
समाधी सोहळा
सकळ जणांची । मायेची सावली
ज्ञानेश माऊली । नमितो मी ।। १।।
वद्य त्रयोदशी । कार्तिक मास ।।
आळंदी निवास । समाधिस्त ।।२।।
कार्य ठरलेले । जेव्हा पूर्ण केले ।।
जगामाजी दिले । ज्ञान सोपे ।।३।।
आलासे समीप । समाधीचा दिस ।।
होती कासावीस । भक्त जन ।।४।।
चंद्रभागे तीरी । आगळा वेगळा ।।
समाधी सोहळा । संजीवन ।।५।।
ज्ञानियांचा राजा । जाहला अमर ।।
नामाचा गजर । नित्य चाले ।।६।।
