आईचे प्रेम
आईचे प्रेम
जन्मास आला रे बाळा, किती कौतुक करू रे तुझे
ना जेवण ना तन्हाची आठवण मला
तुुुुुझ्यात मन लागले रे माझे ।।
वेेेळोवेळी तुला पाहून मी,
मन माझे भाराऊन जाई
रड तुझी कानी आली, मी धावून तुला घेई
घरातुन निघाली गेली मी शिवराई
झाडाच्या फांदीवरती लूगडाची झुई ।।
दिवस, रात्र, वर्ष, किती गेेेले,
तेेेेे मला ठाऊक नाही
पण तुझ्यात माझे म्हातार पण गेले केव्हा
तेेेे मला ठाऊक नाही ।।
जीवनाची ही दशा कशी,
झाली रे माझा लेेकरा
म्हातारपणाची काठी रे माझी
तू रे माझा लेेकरा ।।
जाऊ तुला सोडूनी, मी एक दिन
तुझ्या डोळ्याला येईल अश्रू , एक दिन ।।
साथ ही मायेची किती दिस राहिल
सोडून गेली पसारा मी लेकरा
तुझ्या पाठी सदैव ऊभी राहिल ।।
