मराठीचा अभिमान
मराठीचा अभिमान
माझ्या मराठी भाषेवर
जीवापार प्रेम होय
माझी मराठी माय माऊली
मनापासून नमन होय
सजलेला सुमनात
महाराष्ट्र माझा
संत महात्मांची देवगिरी
महाराष्ट्र माझा
भजनी अभंगात रंगतो
ही पावन भूमि होय
मराठी मातीचा हा लेकरूला
अभिमान किती होय
सरिता माईंची ही कृपा
महाराष्ट्राला लाभली
स्वर्गाचे ही पावन भूमि
संत महात्मांमुळे लाभली
मराठीचा अभिमान असावा
ठाव - ठावी होय
प्रेम हे सदैव उरावे आपली
मराठी मायबोलीला होय
