आल्या अप्सरा
आल्या अप्सरा
इंद्र दरबारी आल्या अप्सरा
चमकली चांदणी चादर
जीव खूळखूळा झाला बावरा
नजर ही तुमची माझ्यावर ।
नव रत्नाचा कमरी पट्टा,
चम चम चमके रात्रिन
अंग नाजूक बसला कट्टा,
तोंडात चावले मी पान
रसिकेच्या काळजात घुसली
बसली मी मंन मंदिर
जीव खूळखूळा झाला बावरा
नजर ही तुमची माझ्यावर ।।
घुंघरू बोलली मंच हा रंगला,
नोटांचा झाला पाऊस
काष्टी लूगडाचा आकाशी रंग,
मिळू दे अंग अंगास
तहान तुमची लागली देवा
इश्काचा द्या ना आधार
जीव खूळखूळा झाला बावरा
नजर ही तुमची माझ्यावर ।।।
