आई
आई
आई म्हणजे...
कोणत्याही गणितात न बसविता येणारं समीकरण,
शब्दांचा भांडार पालथा केला तरी कोणत्याच
शब्दात न मावणारं प्रेमळ व्यक्तिमत्व,
कोणत्याही कवितेत न विस्तारता येणारं प्रेम,
अतुलनीय आपुलकी,
कोणत्याही वजनात न पेलता येणारी माया,
कोणत्याही उंचीत न मोजता येणारं मातृत्व...
