राजे,पुन्हा एकदा जन्म घ्याल का..?
राजे,पुन्हा एकदा जन्म घ्याल का..?
आजच्या स्वार्थी सूर्याला निस्वार्थी आशेची किरणं दाखवाल का..?
माणुसकीचे धडे आजच्या स्वार्थी जगाला शिकवाल का..?
नाव लावलेल्या शिवभक्तांना "खरा शिवाजी" कोण ते सांगाल का..?
तुम्हीच निर्माण केलेल्या स्वराज्याला 'सुराज्य' कराल का..?
राजे,पुन्हा एकदा जन्म घ्याल का..?
अहंकारी पुरुषाला संसाराचे ओझे उचलताना धीर द्याल का..?
स्त्रियांच्या स्त्रीत्वाला खरे अस्तित्व द्याल का..?
चूल-मुल याच्या पलीकडील जग तिला दाखवाल का..?
भ्रष्टाचाराला आळा घालून तरुणाईला योग्य दिशा दाखवाल का..?
एकदाच सांगा ना राजे,
पुन्हा एकदा जन्म घ्या का..?
वणवण भटकणाऱ्या पायांना आसरा तुम्ही द्याल का..?
ह्या गोरगरिबांचे मायबाप होऊन तुमच्या कुशीत घ्याल का..?
हे मृत्यूशी चाललेले राजकारण तुम्ही येऊन थांबवाल का..?
हरवलेला माणुसकीचा धागा शोधून पुन्हा माणसात गुंफाल का..?
एकदाच सांगा ना राजे,
पुन्हा एकदा जन्म घ्याल का..?
माणसातल्या माणसाला शोधून पुन्हा माणसात आणून बसवाल का..?
