माणसा ! कधी होशील रे माणूस..!
माणसा ! कधी होशील रे माणूस..!
माणसा ! कधी होशील रे माणूस
माणसा ! कधी होशील रे माणूस...!!धृ!!
विशाल जगतात,नारायणाचा श्रेष्ठ नर तू झालास
बुद्धी सामर्थ्य ठायी,प्राण्यांमधुनी श्रेष्ठ तू झालास
शोध लावता लावता,माणूस कुठे गहाळ झालास
जग जिंकण्याच्या नादात,हरवत का गेला माणूस
माणसा! कधी होशील रे माणूस...!!१!!
स्वार्थाच्या वेशीवरती जात,धर्म चे लक्तरे बांधून
सर्वधर्म समभावाची भाषणं,देतो रे तू माणूस
शांततेच्या जगात धर्माधर्मात, कटुता पेरून
दंगलीचे पीक घेऊन,कट्टर का झालास माणूस
माणसा! कधी होशील रे माणूस...!!२!!
क्षणिक सुखाच्या लालसेपोटी,इतका जड झालास
राग,लोभ,मोह मायेने,स्वतःलाच फसवू लागलास
रिकाम्या हाती आला होता,काय घेऊन जाशील
सगळं असून देखील,विकारी का झालास माणूस
माणसा ! कधी होश
ील रे माणूस...!!३!!
जीवन म्हणजे जन्ममरणाचा आहे,अखंड प्रवास
आई,वडील आप्तेष्टांना यथाशक्ती,दे परी सुवास
लाव लळा सगळ्यांना,परी तू अंतःकरणापासून
देवाचा अंश तरी,कुविचारी का झालास माणूस
माणसा ! कधी होशील रे माणूस...!!४!!
संगणकाच्या युगात,जुनी संस्कृतीला नका विसरू
उच्च,निच्चतेच्या कसोटीत,माणसाला नका घसरू
माणसाच्या समूहात माणसाला, शोधतोय माणूस
स्वतःच्या अहं पणात,लाचार का झालास माणूस
माणसा ! कधी होशील रे माणूस...!!५!!
जीवन क्षणभंगुर जाणुनी,झाले गेले ते दे रे सोडून
माऊलींच्या चरणी भक्तीमार्गी,नित लीन होऊन
परमार्थाने षडविकारांवर,घे करी विजय मिळवून
संसारी चक्रात ज्ञान,कर्म,भक्ती, योगी हो माणूस
माणसा ! आता तरी हो माणूस...!!६!!