STORYMIRROR

Vishal Patil

Inspirational

3  

Vishal Patil

Inspirational

ऑक्सिजन

ऑक्सिजन

1 min
269

कसा दिवस आज मानवा तुझ्यावर उजळला

ऑक्सिजनसाठी वणवण सर्वत्र भटकू लागला

झाडे लावा झाडे जगवा ला नकार तव तू दिला

म्हणूनच मानवा तुझ्यावर आज निसर्ग कोपला


केलीत मानवा स्वार्थापायी अगणित वृक्षतोड

लाभली तुला आज कुत्रीम ऑक्सिजनची जोड

आता तरी मानवा तुझा निरर्थक हट्टहास सोड

नकोस बनवू झाडे तोडून तुझ्या समृद्धीचा रोड


काळाचीच गरज होती रे झाडे लावा झाडे जगवा

मानवा नेहमीप्रमाणे तू फक्त केलास रे देखावा

मिळवून घेतली होती रे तू सर्वांची खोटी वाहवा

उरली नाही रे तुला आज जीवनाची खरी हवा


वृक्षवल्ली आम्ही सोयऱ्यांचीच कत्तल तव केली

घराघरात विदेशी कुत्रीम झाडांची फॅशन मांडली

सरकार नियम बनवून बनवून आज पार थकली

त्याच नियमांची पायमल्ली तू वेशीवरच टांगली


सृष्टीला हानी पोचविणारा कसा निराळा तुझा छंद

परत फेड म्हणून तुला मिळतोय ऑक्सिजन मंद 

नको करू रे वेडा याला दवाखान्यात,बाटलीत बंद

महत्त्व जाण मानवा ऑक्सिजनचा किती रे सुगंध


असेच राहिले तर होईल ऑक्सिजनचे विसर्जन

नाही उरणार हवेत आणि बाटलीत ऑक्सिजन

ध्यानी मनी घ्या महत्त्व ऑक्सिजनचे सर्वजण

विशाल लेखणी सांगतेय आज तुम्हांला आवर्जून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational