एक पणती मी व्यसनमुक्तीची
एक पणती मी व्यसनमुक्तीची
एक पणती व्यसनमुक्तीची लावू या दारोदारी
सदोदित जळावी मंदगतीने ती आपल्या हृदयाच्या दारी
एक पणती मी व्यसनमुक्तीची-- !!ध्रु !!
बिघडले जग हे कोण सुधारील?
व्यसनी,निस्तेज असे विचारील
निराशा-अंधार,व्यसन मी दूर करती
एक पणती मी व्यसनमुक्तीची-- !!१!!
चोहिकडून भले येवो व्यसनाधीनतेचा अंधार
तरी माझा नाही धीर सुटणार
संतान सूर्याचे मज म्हणती
एक पणती मी व्यसनमुक्तीची-- !!२!!
तुमच्याने व्यसन सुटेल का?नको अंतरी हा विचार
शक्ती लावेल सारी माझी,व्यसनमुक्त मी करणार
न्यूनगंड,व्यसनाधीन ना कधी मजभवती
एक पणती मी व्यसनमुक्तीची-- !!३!!
सूर्याकडून संदेश सर्वांना मिळतो
मार्गदर्शकाला दाह सतावतो
सूर्याचा संदेश मी,या जगती
एक पणती मी व्यसनमुक्तीची-- !!४!!
प्रबोधनाच्या या साऱ्या दीपोत्सवात
लावा ज्योत या व्यसनमुक्तीची
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून,समजून घ्या तुम्ही फक्त आणि फक्त
एक पणती मी व्यसनमुक्तीची-- !!५!!