कर्तव्य
कर्तव्य


चाललो मी चाललो
देश रक्षणासाठी
विसरुनी आई बापाला
सोडून सारी नाती
कालपर्यंत जे बंधू होते
आज झालेत शत्रू
सीमेवरती जाताना
हातामध्ये ध्वज धरू
माझी रक्षा करा
अशी पुकारते माती
सणवार सोडून सारे
यारे सीमेवर
द्या पहारे
नायनाट करा त्या शत्रूचा
दाखवुनी वीरांची छाती