कविता कवी करतात
कविता कवी करतात

1 min

32
कविता कवी करतात
निर्भीड आणि सत्याचा काव्याने
सर्वांच्या मनोमनी उरतात
खोटेपणाने भरलेल्या,
विश्वासघातकीने उफाळलेल्या
या जगरुपी कलशात
थोडासा का होईना
अमृताचा थेंब भरतात
कधी प्रेमाच्या, कधी भंगाच्या
कधी माणसातल्या माणुसकीच्या
कधी परमेश्वर भक्तीच्या, तर
कधी थोड्याश्या मुक्तीच्या
कविता ते रचतात
कोणासाठी झटून झटून
कोणासाठी झुरून झुरून
झुरणाऱ्या साठी दिवा बनून
स्वतः ला अंधारमय विश्वात ढकलतात