शेतकरी
शेतकरी
शेतामध्ये कष्ट करतो
समद्या जगाचा बाप
अरे धुरत माणसा तु त्याला
किती देतो ताप
कष्ट करतो घाम गाळतो
किती होतो त्याचा ऱ्हास
जीवनी त्याच्या दारिद्र्य येऊन
घेतो तो गळफास
नका तुम्ही त्याला त्रास देऊ
नका तुम्ही त्याचा जीव घेऊ
करू द्या त्याला त्याचा काम धंदा
अरे तोच आहे या जगाचा पोशिंदा
शेतासाठी कर्ज काढतो
बैलासम हल ओढतो
रुतले पायी कितीही काटे
तमा न त्याची त्यास वाटे
नका देऊ त्यास आश्वासन खोटे
अरे तुझ्या जगण्याचा
तोच आहे मायबाप
शेतामध्ये कष्ट करतो
समद्या जगाचा बाप
