Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Vajrinkar

Inspirational

3  

Vrushali Vajrinkar

Inspirational

एप्रन

एप्रन

1 min
6.7K


ऍप्रन..

सकाळी सकाळीच ऍप्रन घालून उभी असायची ती,

कॅलशीयमयुक्त दुध, अनेक विटामिनयुक्त भरपूर फळांचे रस काढायला, ,,,,

कधी सॅलेड, कधी पौष्टिक पराठे, कधी सत्वयुक्त थालीपीठ,चटण्या कोशिंबिरी काहीबाही, 

अगदी a to z ,

धडपड असायची काहीतरी करून आरोग्य चांगले ठेवायची कुटुंबाची,

ऍप्रनला हात पुसताना ,

कसे समाधानी असायचा चेहरा, अगदी ,

एखादे ऑपरेशन पार पडलेल्या डॉक्टर सारखा,

सकाळ,संध्याकाळ कधी त्रिकाळ 

तो ऍप्रन,घट्ट कंबरेला बांधताना ,

असंख्य गोष्टी घर करून राहायच्या मनात,

आता हे जमेल ना आपल्याला ,

असं कधीच न वाटता ,

सहज कौशल्याने ,

पार पडायचे सगळे,

धावत पळत ,

किचन मध्ये टांगलेला ऍप्रन बांधला की ,

ती पूर्णपणे वेगळी असायची, ऑपरेशन थेटर मधली निष्णात सर्जन,

अगदी तसेच ना, 

तसेच तर अचूक,एक एक रेखीव, कधी अतिशय किचकट 

असे गुंतागुंतीचे पदार्थ तितक्याच शिताफीने तयार झाले की, 

घाम गाळत,हलकेच हात अँप्रन कडे  वळायचे, आणि,

कळकट झालेला तो ऍप्रन काढून ठेवताना,

हळद तिखटाचं डाग,

 उठून दिसायचे, 

तिच्या कपाळावरील विस्कटलेल्या हळदी कुंकवासारखे,

तेंव्हा एखादा पेशंट,

जसा आदराने, आनंदाने डॉक्टर कडे बघतो, तसे बघायचे घरातले, 

तेंव्हा तिची नजरवाढण्यात एवढी गुंतलेली, 

अपेक्षाच नसायची ,

कोणाकडुन कौतुकाची,

डॉक्टरच तर बनायचे होते तीला, आजाऱ्यासाठी,

 एक स्वप्न होते उरात, एके काळी,

तीने आज,

घर निरोगी ठेवलंय, 

त्या ऍप्रनच्या अडोशाखाली,

डॉक्टरच बनलीय ती कुटुंबाची, 

ऍप्रॉन जरी असला  किचनचा, ,

तरीही, तरीही,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational