भावना
भावना
डोळ्यात एक थेंबही नाही आला,
तुला आठवताना...
खरंच सावरलाय का मन,
की कोरड्या झाल्यात भावना...
इतक्यात असं काय घडलं ?
विरहात हुरहूरणार मन
रडायचं धाय मोकलून...
ते अचानकच ,
का बरं समजूतदार बनलं..!
हसण्यावारी विसरत जाणारे ते क्षण
आता इतके मग्रूर झालेत का ...
कि हास्यामागे लपलेल्या थेंबाला
त्यांनी ओघळूही देऊ नये खाली...?
तुला आठवताना
माझ्या डोळ्यात आता ....
येत नाही पाणी ..येत नाही पाणी!
खरेच सावरलाय का मन
की कोरड्या झाल्यात भावना...?
आठवणी अशाच असतात ,
येत राहतात क्षणोक्षणी..
काय झाले नाही आले जरी,
डोळ्यात पाणी...

